डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महाविद्यालयात उत्साहात साजरी

चिपळूण :- दि. १ ऑगस्ट : महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली.

यावेळी प्राध्यापक येलये सर यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्ती, स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक समतेसाठीच्या कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी या दोन्ही महान विभूतींचे विचार आत्मसात करून शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवा यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे  सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कु सुप्रिया चौघुले व  कु सुजल सांवत आभारप्रदर्शन केले

डॉ.तानाजीराव चोरगे महाविद्यालयात गुरुपौर्णिमा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी.

चिपळूण __डॉ  तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवता सरस्वती माता   यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गुरु वंदना, मनोगते, प्रेरणादायी भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिक्षकाला पुष्पगुच्छ व आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. विद्यार्थ्यांच्या या प्रेमपूर्ण उपक्रमामुळे वातावरण भावनिक व आनंदमय झाले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या या आदरभावाचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्रा येलये सर यांनी गुरूचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान स्पष्ट करत ज्ञान, संस्कार, शिस्त आणि चारित्र्य घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती सदैव आदर, कृतज्ञता आणि निष्ठा बाळगावी, असे आवाहन केले. प्राध्यापकांनी गुरुपौर्णिमेचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व विषद केले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष वाणिज्य चा विद्यार्थी कु आशिष शिर्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन तृतीय वर्ष वाणिज्य चा विद्यार्थी कु सुजल सावंत यांनी केले. गुरू-शिष्य नात्यातील आदर, विश्वास आणि संस्कार अधिक दृढ करणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

डॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी; अंतिम फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड.

मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५९ व्या सांस्कृतिक युवा महोत्सव २०२६ – २७ च्या उत्तर रत्नागिरी झोन ०९    ची प्राथमिक फेरी घरडा   महाविद्यालय लवेल, खेड जि. रत्नागिरी येथे दि.५ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न झाली. उत्तर रत्नागिरी झोन ०९ मध्ये एकूण २० महाविद्यालयांनी विविध कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे,डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी- पालवण ता- चिपळूण जि- रत्नागिरी यांनी ठाणे जिल्ह्यातील जव्हार मोकाडा आदिवासी नृत्य ‘गौर’ या लोकनृत्य कला प्रकारांमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच सुप्रिया राजेंद्र चौगुले व सलोनी शाहीर भुवड या विद्यार्थिनींनी ‘वादविवाद’ स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक पटकविला.

या नृत्यातील सर्व विद्यार्थ्यांची  व वादविवाद स्पर्धेमधील विद्यार्थ्यीची निवड मुंबई विद्यापीठ येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सोनल सुर्वे, प्रा. धनश्री सुर्वे कोरियोग्राफर सागर कुंभार, राहुल भुवड व सर्व प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाची व सांस्कृतिक विभागाच्या कार्याची दखल घेत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. निखिल चोरगे सर ,सचिव मिलिंद सुर्वे, अधीक्षक प्रफुल्ल सुर्वे, गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम सर,जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे मॅडम ,निवळी गावचे प्रतिष्ठित नागरिक रावसाहेब सुर्वे ऊर्फ आण्णा सर्व संचालक पदाधिकारी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.अंजलीताई चोरगे यांनी महोत्सवात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

रानभाज्या महोत्सव

डॉ. तानाजीराव चोरगे कॉलेजमध्ये ‘करिअर संसद’ विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचा शपथविधी उत्साहात

चिपळूण, ता. प्रतिनिधी (संदीप येलये): डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र (MITC) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत ‘करिअर संसद’ विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अंजलीताई चोरगे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश निर्मळ यांनी केले. त्यानंतर करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. आदित्य संतोष जोशी यांची मुख्यमंत्री, सुप्रिया राजेंद्र चौगुले यांची नियोजन मंत्री, सलोनी शाहीर भुवड यांची कायदे व शिस्तपालन मंत्री, आर्यन रामचंद्र खेराडे यांची सामान्य प्रशासन मंत्री, आशिष सचिन शिर्के यांची माहिती व प्रसारण मंत्री, पायल अनंत लांबे यांची उद्योजकता विकास मंत्री, रुद्रव अरविंद चव्हाण यांची रोजगार व स्वयंरोजगार मंत्री, सुकेशनी राजेंद्र पवार यांची कौशल्य विकास मंत्री, समिता संतोष पडयाळ यांची संसदीय कामकाज मंत्री, सुरभी भिकाजी जाधव यांची महिला व बालविकास
मंत्री, तर समीक्षा संजय घाग यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना प्राचार्या अंजलीताई चोरगे यांनी पदाची शपथ देऊन त्यांना प्रशस्तीपत्र व बिल्ला लावून गौरव केला.
प्रमुख पाहुण्या जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन, करिअर नियोजन, सातत्य, सकारात्मक दृष्टीकोन आणि कौशल्य विकास या पाच सुवर्णमंत्रांच्या माध्यमातून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या अंजलीताई चोरगे यांनी करिअर कट्टा हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि करिअर घडविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले. मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी आत्मविश्वास, मेहनत आणि योग्य नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. संदीप येलये यांनी करिअर कट्टा उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा प्रभावीपणे उपयोग करून नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी विकसित करावी, असे आवाहन केले.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुप्रिया चौगुले हिने केले, तर आभार प्रदर्शन मुख्यमंत्री आदित्य जोशी यांनी केले.

डॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन साजरा

चिपळूण, ता. प्रतिनिधी (संदिप येलये): डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी संस्थेच्या मध्यवर्ती ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री. विनायक कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या शिक्षणप्रसार, सामाजिक समता, आरक्षण, स्त्रीशिक्षण तसेच वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेतला. सामाजिक न्याय, समानता आणि मानवतेची मूल्ये जोपासण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून प्रा. संदीप येलये यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचे आणि समाजपरिवर्तनातील योगदानाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनीही मनोगते व्यक्त करत सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर तसेच शाहू महाराजांच्या विचारांच्या समकालीन महत्त्वावर भाष्य केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. सुप्रिया चौघुले यांनी, तर आभार प्रदर्शन कु. सुरभी जाधव हिने केले. प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

डॉ. तानाजीराव चोरगे कॉलेजचा परवीदान कार्यक्रम संपन्न

कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित, मुंबई विद्यापीठ संलग्न, डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी पालवण व डॉ. तानाजीराव चोरगे अध्यापक महाविद्यालय, मांडकी -पालवण ता. चिपळूण, जि. रत्नागिरी या महाविद्यालयाचा पदवीदान कार्यक्रम दि. ३१ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या बहुउद्देशिय सभागृहामध्ये संस्थापक अध्यक्ष, कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

या कार्यक्रमाला संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, संचालिका व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सौ. अंजलीताई चोरगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सचिन तांबेकर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. नारायण पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची रूपरेषा मिरवणूक प्रारंभ, सभागृहात आगमन, दीप प्रज्वलन, वंदे मातरम, विद्यापीठ गीत, महाराष्ट्र गीत, पदवीदान सोहळा आरंभ, अहवाल वाचन, पदवी प्रमाणपत्र प्रदान सोहळा, अध्यक्षीय मार्गदर्शन व राष्ट्रगीत हे होते. या पदवीदान कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालय व अध्यापक महाविद्यालय यांची एकूण ९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. तानाजीराव चोरगे यांनी अध्यक्षिय भाषणात मुलांची मानसिकता व आताची शिक्षणव्यवस्था यावर आपले चिंतनात्मक विचार मांडले. या पदवीदान कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य व संचालक मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले

डॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात

चिपळूण, ता. प्रतिनिधी : डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात २१ जून २०२६ रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे महत्त्व व निरोगी जीवनशैलीमध्ये त्याची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी व प्राध्यापकांनी सामूहिक योगासने, प्राणायाम तसेच ध्यानाचा सराव केला.

यावेळी प्रा. संदीप येलये यांनी योगामुळे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असल्याचे सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे एकाग्रता, आत्मविश्वास व कार्यक्षमता वाढते, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.

Yearly Programs 2025-26

57 youth festival north zone Cultural activities academic year 2024-25

56 youth festival north zone all activities academic year 2023-24